• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

चोपडा शहर पोलिसांची तत्परता; अवघ्या दोन तासांत हरवलेल्या सहा वर्षीय चिमुकल्याचा सुखरूप शोध

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 1, 2026
in चोपडा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
चोपडा शहर पोलिसांची तत्परता; अवघ्या दोन तासांत हरवलेल्या सहा वर्षीय चिमुकल्याचा सुखरूप शोध

चोपडा, 1 जुलै: शहरातील गणेश कॉलनी परिसरातून हरवलेल्या सहा वर्षीय चिमुकल्याचा चोपडा शहर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत शोध लावून त्याला सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या तत्परतेमुळे संभाव्य अनर्थ टळला असून या कार्याबद्दल पालकांनी पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार (दि. १ जुलै) रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास गणेश कॉलनी येथील रहिवासी शोभाबाई कैलास चौधरी यांनी त्यांचा नातू रुद्र संदीप चौधरी (वय ६) हा खेळत असताना हरवल्याची माहिती चोपडा शहर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने शोधमोहीम सुरू केली.

चोपडा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके रवाना करण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तसेच विविध ठिकाणी कसून शोध घेण्यात आला. अत्यंत शिताफीने आणि तांत्रिक पद्धतीने तपास करत पोलिसांनी अवघ्या दोन तासांत रुद्रचा शोध लावला.

सापडलेल्या चिमुकल्याला पोलीस ठाण्यात आणून विचारपूस करण्यात आली. त्याने स्वतःचे नाव रुद्र संदीप चौधरी असल्याचे सांगितल्यानंतर त्याच्या आजी शोभाबाई कैलास चौधरी यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर रुद्रला त्याचे पालक, मामा आणि मामी यांच्या स्वाधीन करण्यात आले.

यावेळी रुद्रने खेळत-खेळत तो रस्ता चुकल्याने घरी जाण्याचा मार्ग सापडत नसल्याचे सांगितले. हरवलेला मुलगा सुखरूप परत मिळाल्याने कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. त्यांनी चोपडा शहर पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक करत मनापासून आभार व्यक्त केले.

हेही वाचा: अवैध सावकारीविरोधी कायदा आणखी कडक करणार; मंत्री बाबासाहेब पाटील यांची विधानसभेत माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: chopda city policechopda newsmarathi newsmissing casesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

October 9, 2026
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

October 9, 2026
मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

October 8, 2026
महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

October 7, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

October 7, 2026
Jalgaon News: सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

Jalgaon News: सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

October 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page