पुणे, 20 जुलै : “पक्षप्रवेशाबाबत मला शरद पवार काहीही बोलले नाहीत आणि मीही त्यांना काहीही बोललो नाही. म्हणूनच पक्षांतराचा प्रश्नच येत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक स्थित्यंतरं घडली. भविष्यात काहीही होऊ शकते. कदाचित शरद पवार-अजित पवार एकत्रही येऊ शकतील,” असे वक्तव्य अजित दादा गटाचे आमदार अतुल बेनके यांनी केले आहे. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
अतुल बेनके यांचे मोठे वक्तव्य –
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेले अतुल बेनके यांनी आज खासदार शरद पवार यांची भेट घेतली. दरम्यान, त्यांनी या भेटीनंतर दिलेल्या प्रतिक्रियेने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. बेनके म्हणाले की, भविष्यातील राजकारणाबाबत सध्यातरी काहीही सांगता येत नाही. मी घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्षासोबतच आहे. पण भविष्यात स्थित्यंते घडली तर मी काही सांगू शकत नाही. तसेच कदाचित शरद पवार-अजित पवार एकत्रही येऊ शकतील, असेही बेनके म्हणाले आहेत.
शरद पवारांच्या भेटीवर काय म्हणाले? –
आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांच्या भेटींसंदर्भात बोलताना सांगितले की, “माझ्या या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, असे मला वाटते. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून ते आमच्यासाठी दैवत आहेत. गेल्या 40 वर्षांचा बेनके परिवाराचा राजकीय इतिहास हा शरदचंद्र पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील यांच्या आशीर्वादाने चालू राहिला आहे. सध्या राजकीय स्थित्यंतरे झाली.
दरम्यान, सहा महिन्यांच्या तटस्थतेच्या भूमिकेनंतर आता जुन्नर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून अजित पवार यांच्यासोबत राहणं पसंत करणार असल्याचे बेनके यांनी स्पष्ठ केले.
हेही वाचा : जळगाव जिल्ह्यातील पाच गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई, पाचोरा तालुक्यातील एकाचा समावेश