• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home धुळे

Shiv Puran Katha : शिरपूरमध्ये शिवपुराण कथेचे ऐतिहासिक आयोजन, भाविकांचा अभूतपूर्व प्रतिसाद

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 5, 2024
in धुळे, खान्देश, ताज्या बातम्या
PANDIT PRADIP MISHRAS SHIVPURAN KATHA AYOJAN IN SHIRPUR

शिरपूरमध्ये शिवपुराण कथेचे ऐतिहासिक आयोजन, भाविकांचा अभूतपूर्व प्रतिसाद

मिलिंद वाणी, प्रतिनिधी

शिरपूर (धुळे) – धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या उपस्थितीत शिवमहापुराण कथेचे भव्य आणि दिव्य अशा ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे. 1 डिसेंबरपासून या कथेला सुरुवात झाली असून येत्या 7 डिसेंबरपर्यंत ही कथा चालणार आहे. दरम्यान, याठिकाणी पहिल्या दिवसापासूनच कथेला भाविकाचा प्रचंड असा प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

1 ते 7 डिसेंबरदरम्यान, दररोज दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत शिरपूर शहरातील करवंद नाक्याजवळील करवंद रोडवरील भगवान महावीर जैन उद्यानाच्या जागेवर हे भव्य असे शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. आता पर्यंत कथेला चार दिवस झाले असून चारही दिवस याठिकाणी भाविकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यामध्ये भाविकांची सर्व सोय करण्यात आली आहे.

कथेच्या तिसऱ्या दिवशी असे होते वातावरण –

कथेच्या तिसऱ्या दिवशी लाखोंच्या संख्येने भाविक याठिकाणी उपस्थित होते. याबाबत आयोजक गिरीश सनेर यांनी बोलताना त्यांनी सांगितले की, पहिल्या दिवशी महाराजांनी आम्हाला आशीर्वाद देत सांगितले की, काशीच्या कथेला पहिल्या दिवशी जेवढी गर्दी होती तेवढी गर्दी शिरपूरमध्ये पहिल्याच दिवशी पाहायला मिळाली. याठिकाणी हा रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे. शिरपूर येथील ही अभूतपूर्व कथा सुवर्णाक्षरात नोंदली जाईल. कथेच्या निमित्ताने लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात उत्साह आहे. आयोजकांनी केलेली व्यवस्था अतिशय मोलाची आहे. कुणाचाही गैरसोय होणार नाही, सर्वांना सगळ्या गोष्टी मिळतील, रात्री राहण्याची सोय असेल, जेवणाची सोय असेल, या सगळ्या सोयींसाठी याठिकाणी आयोजकांनी सर्व आपल्या पद्धतीने ज्या काही सोयी असतील, त्या सर्व सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याठिकाणी शिरपूरची कथा ही महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची कथा होणार आणि सर्व रेकॉर्ड ब्रेक होणार, असे ते म्हणाले. तसेच ज्यावेळी बाबांचे शिरपूरमध्ये आगमन झाले, मिरवणूक निघाली, असे स्वागत भारतात कुठेही झाले नाही, असे त्यावेळी बाबांनी या सर्व गोष्टींचे कौतुक करत सांगितल्याची माहितीही त्यांनी दिली.

तरुणाईही स्वयंसेवक म्हणून देतायेत सेवा –

श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे स्वयंसेवक म्हणून याठिकाणी कार्यरत आहोत. आतापर्यंत कधीही न झालेला असा हा अभूतपूर्व कार्यक्रम शिरपूर सुवर्ण नगरीत होत आहे. लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. काशी येथे 5 व्या दिवशी झालेली गर्दी याठिकाणी पहिल्याच दिवशी झाल्याचे बाबांनी सांगितले ही, मोठी बाब आहे, असे याठिकाणी स्वयंसेवक म्हणून सेवा देणारे रोहन कलाल या तरुणाने सांगितले.

देवेंद्र फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये सहभागी होणार का?, एकनाथ शिंदेंनी वाढवला सस्पेन्स, काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: Pandit pradeep mishraPandit pradeep mishra shirpurshivpuran kathashivpuran katha shirpur

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव-दिल्ली विमानसेवा प्रायोगिक तत्त्वावर 2 मेपासून सुरू होणार; खासदार स्मिता वाघ यांची माहिती

जळगाव-दिल्ली विमानसेवा प्रायोगिक तत्त्वावर 2 मेपासून सुरू होणार; खासदार स्मिता वाघ यांची माहिती

April 25, 2026
मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला सखोल आढावा

मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला सखोल आढावा

April 25, 2026
जळगाव जिल्ह्यात विशेष नाकाबंदी मोहीम; 2100 हून अधिक वाहनांची तपासणी, 2 लाख 38 हजारांचा दंड वसूल

जळगाव जिल्ह्यात विशेष नाकाबंदी मोहीम; 2100 हून अधिक वाहनांची तपासणी, 2 लाख 38 हजारांचा दंड वसूल

April 25, 2026
विद्यार्थ्यांचे हित साधून संस्थेला प्रगतीच्या दिशेने नेण्याचे काम केले पाहिजे – आमदार किशोर आप्पा पाटील

विद्यार्थ्यांचे हित साधून संस्थेला प्रगतीच्या दिशेने नेण्याचे काम केले पाहिजे – आमदार किशोर आप्पा पाटील

April 25, 2026
पाचोऱ्यात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांचा ‘भिमगीतांचा शिंदेशाही बाणा’ कार्यक्रम

पाचोऱ्यात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांचा ‘भिमगीतांचा शिंदेशाही बाणा’ कार्यक्रम

April 25, 2026
राज्याच्या कोणत्याही भागात कार्यरत असले तरी जळगावची माती आणि येथील माणसे कायम स्मरणात राहतील – मिनल करनवाल

राज्याच्या कोणत्याही भागात कार्यरत असले तरी जळगावची माती आणि येथील माणसे कायम स्मरणात राहतील – मिनल करनवाल

April 24, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page