• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा येथे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर सुरू करण्याची मागणी; आमदार किशोर आप्पा पाटील यांना दिव्यांग बांधवांचे निवदेन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 14, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोरा येथे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर सुरू करण्याची मागणी; आमदार किशोर आप्पा पाटील यांना दिव्यांग बांधवांचे निवदेन

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 14 ऑगस्ट: पाचोरा-भडगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात जावे लागत असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पाचोरा येथे दरमहा नियमितपणे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी व वाटप शिबिर सुरू करण्यात यावे, अशी मागणी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडे समर्थ दिव्यांग सामाजिक संस्था संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर सुरू करण्याची मागणी –

पाचोरा व भडगाव तालुक्यातील अनेक दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जळगावपर्यंत प्रवास करावा लागतो. ग्रामीण भागातील दिव्यांगांसाठी हा प्रवास अत्यंत त्रासदायक ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः अस्थिव्यंग, अंध, मूक-बधिर तसेच गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या दिव्यांगांना बस किंवा खासगी वाहनातून प्रवास करणे, जिल्हा रुग्णालयातील गर्दीत तपासणी करून घेणे यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो.

प्रवासाचा खर्च आणि इतर अडचणींमुळे काही दिव्यांग शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र काढण्यासही पुढे येत नसल्याची खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरच शिबिर सुरू झाल्यास दिव्यांग बांधवांचा वेळ, पैसा आणि मोठा त्रास वाचू शकतो, असेही निवेदनात म्हटले आहे.

पाचोरा येथेच सुविधा देण्याची मागणी –

जळगाव जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये स्थानिक पातळीवर दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीची शिबिरे आयोजित केली जात असल्याचा दाखला देत, पाचोरा येथेही अशी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. या शिबिराचा लाभ पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील गरजू दिव्यांगांना मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

आमदार किशोर आप्पा पाटील यांनी संबंधित आरोग्य प्रशासन आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी समन्वय साधून हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी परमेश्वर पाटील यांनी केली आहे. पाचोरा येथे नियमित दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर सुरू झाल्यास शेकडो दिव्यांग कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा: पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा

बातमी शेअर करा !
Share
Tags: mla kishor appa patilpachora newsparmeshwar patilpersons with disabilitiessuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

September 11, 2026
पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

September 11, 2026
आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

September 11, 2026
एमपीएससीच्या विद्यार्थी प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत भेट; औषध निरीक्षक पेपरफुटीपासून गट-ब, गट-क परीक्षांच्या चौकशीपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा

एमपीएससीच्या विद्यार्थी प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत भेट; औषध निरीक्षक पेपरफुटीपासून गट-ब, गट-क परीक्षांच्या चौकशीपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा

September 11, 2026
लोकसेवा हक्क कायद्याची योग्य व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – आयुक्त चित्रा कुलकर्णी

लोकसेवा हक्क कायद्याची योग्य व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – आयुक्त चित्रा कुलकर्णी

September 11, 2026
रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र अंतर्गत जळगाव जिल्ह्यात 23 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन

रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र अंतर्गत जळगाव जिल्ह्यात 23 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन

September 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page