• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी शासनाचा महत्त्वाचा निर्णय; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची अधिवेशनात मोठी घोषणा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 23, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी शासनाचा महत्त्वाचा निर्णय; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची अधिवेशनात मोठी घोषणा

मुंबई, 23 जून: राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय देण्यासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतन वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभा व विधानपरिषद मध्ये केली.

विधानसभेत व विधानपरिषदेत निवेदन करताना मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटी ही केवळ परिवहन संस्था नसून महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. गेली आठ दशके ‘लालपरी’ने राज्यातील शेतकरी, विद्यार्थी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुर्गम भागातील नागरिकांना सेवा दिली आहे. या सेवेमागे एसटी कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे असून त्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे.

या निर्णयानुसार एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५८ टक्के करण्यात आला आहे; तसेच घरभाडे भत्ता ८-१६-२४ टक्क्यांवरून १०-२०-३० टक्के करण्यात आला आहे. वार्षिक वेतनवाढीचा दर २ टक्क्यांवरून ३ टक्के करण्यात आला आहे. यामुळे एसटी महामंडळावर दरमहा सुमारे ४५ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला, तरी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी हा खर्च आवश्यक असल्याचे मंत्री सरनाईक यांनी विधानसभेत सांगितले. तसेच या आगामी काळात महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे ५ हजार ६४९ कोटी रुपये अदा करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

शासनाच्या या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी २९ जून २०२६ रोजी प्रस्तावित धरणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती देत, हा शासन आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर विश्वासाचा विजय असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

हेही वाचा: मान्सून पुन्हा सक्रिय; राज्यातील अनेक भागांत पावसाची दमदार हजेरी, जळगावचा हवामान अंदाज काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsST Corporation employeessuvarna khandesh livetransport minister pratap sarnaikwinter session 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रावेर–पुनखेडा ते पातोंडी रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करण्याच्या आमदार अमोल जावळे यांच्या प्रशासनाला सक्त सूचना

रावेर–पुनखेडा ते पातोंडी रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करण्याच्या आमदार अमोल जावळे यांच्या प्रशासनाला सक्त सूचना

August 8, 2026
जळगावच्या शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; अवघ्या 24 तासांत लावला चोरीचा छडा, वेल्डिंग मशिनसह 16 ग्राईंडर मशिनचे बॉक्स जप्त

जळगावच्या शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; अवघ्या 24 तासांत लावला चोरीचा छडा, वेल्डिंग मशिनसह 16 ग्राईंडर मशिनचे बॉक्स जप्त

August 8, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026; जळगाव जिल्ह्यात 31,908 पात्र शेतकऱ्यांसाठी 184.16 कोटी रुपये वितरित

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026; जळगाव जिल्ह्यात 31,908 पात्र शेतकऱ्यांसाठी 184.16 कोटी रुपये वितरित

August 8, 2026
जळगाव बाह्यवळण मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार; ‘या’ दिवसापासून धुळे-नागपूर एकेरी वाहतुकीचा मार्ग खुला

आरोग्य विभागातील प्रलंबित पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियांना गती द्या; मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

August 8, 2026
जळगाव बाह्यवळण मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार; ‘या’ दिवसापासून धुळे-नागपूर एकेरी वाहतुकीचा मार्ग खुला

जळगाव बाह्यवळण मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार; ‘या’ दिवसापासून धुळे-नागपूर एकेरी वाहतुकीचा मार्ग खुला

August 8, 2026
शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांची जळगाव जिल्ह्यातील शाळांना भेट

शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांची जळगाव जिल्ह्यातील शाळांना भेट

August 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page